Tuesday, 28 February 2017

श्री भराडी देवी यात्रा, आंगणेवाडी.....

      श्री भराडी देवी यात्रा, आंगणेवाडी.....


श्री भराडीदेवीचं मंदिर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक जागृत देवस्थान म्हणून ओळखलं जातं. मालवणपासून अवघ्या १५ कि.मी. अंतरावर एका  माळरानावर श्री भराडी देवीची यात्रा भरते. ही यात्रा दोन दिवस चालते.
कोकणात प्रामुख्याने मार्लेश्वर, कुणकेश्वर आणि आंगणेवाडी या तीन जत्रा अत्यंत लोकप्रिय आहेत. त्यातही गेल्या काही वर्षांत मुंबईतून आंगणेवाडीच्या जत्रेला जाणार्या चाकरमान्यांचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. पूर्वी जत्रेला येण्यासाठी एसटीच्या लाल डब्याशिवाय पर्याय नव्हता. आता कोकण रेल्वेबरोबरच खाजगी वाहनांचीही साथ मिळू लागल्याने दरवर्षी आंगणेवाडीची जत्रा गर्दीचे विक्रम मोडत आहे. आंगणेवाडी ही खरं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मसुरे या गावाची एक वाडी. म्हणजे एका अर्थाने ही एका वाडीची जत्रा म्हणायला हवी, मात्र गेल्या पाच-पंचवीस वर्षांत तिला स्वरूप आलं आहे ते महाराष्ट्रातील एखाद्या मोठ्या तीर्थक्षेत्रासारखं. अडलेले नडलेले गोरगरीब मोठ्या श्रद्धेने जसे या जत्रेला जातात, तसंच खिशात चार पैसे खुळखुळू लागलेले हवशे-नवशे आंगणेवाडीची जत्रा नेमकी आहे तरी काय या उत्सुकतेपोटीही जातात.
कोकणात जत्रांची कमतरता नाही. वर्षाच्या ठरावीक तिथीला प्रत्येक गावात  जत्रा भरते. मात्र श्री भराडीदेवीच्या  जत्रेची तारीख कुठल्या पंचागात अथवा कॅलेंडरमध्ये सापडणार नाही.  कारण ती निश्चित नसते. देवीचा कौल मिळाल्यावरच तारीख ठरते. ही तारीख  ठरवण्याची प्रथाही उत्सुकतेची आहे. दिवाळीत शेतीची कामं झाली की  आंगणेवाडीतील देवीचे मानकरी एका डाळीवर (बांबूपासून बनवलेली चटई) बसतात.  यालाच डाळप स्वारी म्हणतात आणि डुकराच्या शिकारीचा (पारध) दिवस ठरवतात.  देवीला कौल लावला जातो. गावकरी जंगलात घुसतात आणि डुकराची शिकार वाजतगाजत  घेऊनच परततात. त्यानंतर काही दिवसांनी जत्रेचा दिवस ठरवण्यासाठी पुन्हा  डाळप स्वारी होते आणि कौल लावून जत्रेचा दिवस निश्चित होतो.
सर्वात महत्त्वाचं  वैशिष्ट्य म्हणजे जत्रेची तारीख. जत्रेची तारीख इतरांना कळवणं हा आगळा  अनुभव फक्त या यात्रेतच पहायला मिळतो. एसटीवर, रिक्षावर, सुमोवर,  ग्रामपंचायतीच्या फळ्यावर जिथे जागा मिळेल तिथे तिथे… प्रत्येक ठिकाणी  खडूचा रंग उठतो आणि उमटली जाते ती जत्रेची तारीख… जशी तारीख जवळ येते, तसा  सुरू होतो तो खरा जल्लोष… आंगणेवाडीच्या यात्रेसाठी भव्य असा मंडप  उभारण्यात येतो. केवळ ग्रामस्थांचीच नाही तर, प्रशासनाची, एसटी महामंडळाची,  सार्वजनिक बांधकाम खात्याची सर्वांचीच प्रचंड घाईगर्दी सुरू असते. कामाला  तास कमी पडत असतात. नियोजन आणि मनुष्यसाठा जबरदस्त असतो. पण जत्रेत कसलीच  कमतरता राहू नये यासाठी अधिकार्यांच्या मनातला आईचा भक्त सारखा धडपडत असतो.  कधी विचार केलाय की जत्रेसाठी तीन दिवस राबणार्या एसटी कर्मचार्यांना,  बांधकाम खात्याच्या कर्मचार्यांना, पोलीस कर्मचार्यांना आणि यासारखे अनेकजण  जे ड्युटीवर असतात त्यांना वाटत नसेल का, आपणही सुट्टी टाकून फॅमिलीसह  जावं जत्रेला… पण नाही, इथेही जिंकतो त्या प्रत्येकाच्या मनातला भक्त. कारण  जत्रेला येणार्या भक्ताची सेवा करणं हीच खरी आई भराडीची सेवा.
 आंगणेवाडी ही मालवण तालुक्यातील मसूरे गावची एक छोटीशी वाडी. पण या वाडीतील  भराडी देवीची वार्षिक जत्रा आता मुंबई-पुण्यातीलच नव्हे तर देश-विदेशातील  मालवणी माणसासाठी न चुकवता येण्यासारखी स्थिती बनली आहे. आंगणेवाडी  जत्रेच्या तारखेकडे मुंबईकर डोळे लावून बसलेले असतात. तारीख जाहीर झाली की  सुट्टी टाकण्यापासून खाजगी गाडी ठरवण्यापर्यंत आणि रेल्वेच्या तिकीट रांगेत  सकाळीच जाऊन उभं राहण्यापर्यंतची धावपळ केली जाते. इंडिकापासून लक्झरी  बसपर्यंत संख्येनुसार भाविकांचा जथ्था मालवणच्या दिशेने रवाना होतो.  भराडीच्या जत्रेत एकजीव होतात आणि पुन्हा आपल्या रहाटगाड्यात परततात.  जत्रेची तारीख जाहीर झाली की सिंधुदुर्गातील बहुतांश रिक्षांवर मागे  आंगणेवाडी जत्रा अमूक अमूक तारखेला असा फलक लावला जातो. एसटीमध्येही  कुणीतरी खडूने जत्रेची तारीख लिहितो. भराडीची महती अशी गावा-गावात,  वाडी-वाडीत सर्वदूर पसरते आणि मग चुकला माकला भाविकही शक्तिपीठाशी कनेक्ट  होतो!
२०-२५ वर्षांपूर्वी ही जत्रा काही हजारांच्या घरात होती. आता मात्र ती  लाखांची झाली आहे. गेल्यावर्षी १२ लाख भाविकांनी या जत्रेला हजेरी लावली  अशी पोलिसांची आकडेवारी सांगते. पूर्वी मंदिरालगत परिसरातच दुकाने थाटली  जायची, पण गेल्या काही वर्षात दुकानांची संख्या वाढली आणि परिसरही विस्तारत  गेला. त्यामुळेच गर्दीही पांगली. असं असलं तरी कोकणातील या शक्तिपीठाशी असलेल्या कनेक्टिव्हिटीमध्ये काही  खंड पडला आहे, नेटवर्क तुटलं आहे, असं घडलं आहे का? बिलकूल नाही. कारण  मुंबई-पुण्याच्या चक्रात पिचलेल्या प्रत्येक कोकणी माणसाला जगण्याचं बळ  देणारं हे आनंदाचं झाड आहे. कोकणी माणसावर मायेची आणि कृपेची सावली करून  फेसबुक आणि ऑनलाइन चॅटिंगच्या युगात वावरणारी ही माणसं आईच्या ओढीने जेव्हा  आंगणेवाडीत धाव घेतात, गर्दीत स्वतःला हरवून बसतात ती एका अफाट  श्रद्धेपोटीच. ही गर्दी म्हणजे निस्सीम श्रद्धा असणार्यांचा जागरच होय.

(पारंपारीक रितीरिवाजाप्रमाणे देवीला कौल लावून देवीने दिलेल्या कौलानुसार 2 मार्च 2017 हि तारीख यात्रेसाठी निश्चित करण्यात आली आहे.)

Monday, 27 February 2017

Mumbai Cha Raja












चिंतामणी माऊली



                        चिंतामणी माऊली           











            

Sunday, 26 February 2017

मराठी भाषा दिवस

मराठी भाषा दिवस
जागतिक मराठी भाषा दिवस, मराठी भाषा दिन. २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी साहित्याचा मानदंड वि.वा.शिरवाडकर यांचा जन्मदिवस, हा दिवस ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून साजरा केला जातो.
कुसुमाग्रज : (२७ फेब्रुवारी १९१२ ते १० मार्च १९९९) पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर. एक श्रेष्ठ आधुनिक मराठी कवी नाटककार व कादंबरीकार. कुसुमाग्रज या नावाने काव्यलेखन. जन्म पुणे येथील. जीवनलहरी, किनारा, मराठी माती, वादळवेल इत्यादी त्याचे प्रकाशित काव्यसंग्रह, विशाखा हा काव्यसंग्रह आधुनिक मराठी काव्याचे एक कायमचे भूषण आहे. दुसरा पेशवा, वीज म्हणाली धरतीला, नटसम्राट, राजमुकुट इत्यादी गाजलेली नाटके. १९७४ मध्ये नटसम्राट ह्या नाटकाला साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले. वैष्णव, जान्हवी, कल्पनेच्या तीरावर ह्या कादंबर्‍या. १९६४ मधील गोव्याच्या साहित्य समेलनाचे ते अध्यक्ष होते.
मराठी ही इंडो-युरोपीय भाषाकुलातील एक भाषा आहे. भारतातील प्रमुख २२ भाषांपैकी मराठी एक आहे. महाराष्ट्र आणि गोवा ह्या राज्यांची मराठी ही अधिकृत राजभाषा आहे. मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकसंख्येनुसार मराठी ही जगातील पंधरावी व भारतातील चौथी भाषा आहे.
मराठी बोलणाऱ्यांची एकूण लोकसंख्या ९,००,००,००० आहे. मराठी भाषा ९व्या शतकापासून प्रचलित आहे. मराठी भाषेची निर्मिती संस्कृतमधून निर्माण झालेल्या महाराष्ट्री प्राकृत व अपभ्रंश या भाषांपासून झाली आहे. याउलट मराठी आणि काही अन्य भारतीय भाषांच्यावर संस्कार होऊन संस्कृत भाषा बनली असेही काही विद्वान मानतात. मराठी भाषा ही इसवी सनाच्या आधीही होती असे सिद्ध करण्याचा प्रयत्‍न प्रा. हरी नरके करित आहेत.
.   🍃 ॐ नम: सिवाय🍃
🌷**•🍃•*´`*•¸🍃¸•*´`*•.🌷
            ,-"""-,
           !  ==  !
           !   @  !🍃🍃
  🍃 ('''"""""""""")==
🍃🍃 '>------<''''''''"🍃🍃
🌷**•🍃•*´`*•¸🍃¸•*´`*•.🌷
   🙏 हर हर महादेव हर 🙏
🌷**•🍃•*´`*•¸🍃¸•*´`*•.🌷  
  ॐॐॐजयशिवशंकरॐॐॐ
🌷**•🍃•*´`*•¸🍃¸•*´`*•.🌷
  ॐॐनमःपावॅतीपतेयनमःॐॐ
🌷**•🍃•*´`*•¸🍃¸•*´`*•.🌷
     🍃 ॐ नम: सिवाय🍃
ॐॐॐॐ ॐॐॐॐ ॐॐॐy
     🍃 ॐ नम: सिवाय🍃
🍃🍂🍁🍃🍁🍃🍁🍂🍃
🙏જય જય શીવ શંભુ દાતાર🙏
🙏 Har Har mahadev. 🙏
भगवान शिव के 108 नाम ----
१- ॐ भोलेनाथ नमः
२-ॐ कैलाश पति नमः
३-ॐ भूतनाथ नमः
४-ॐ नंदराज नमः
५-ॐ नन्दी की सवारी नमः
६-ॐ ज्योतिलिंग नमः
७-ॐ महाकाल नमः
८-ॐ रुद्रनाथ नमः
९-ॐ भीमशंकर नमः
१०-ॐ नटराज नमः
११-ॐ प्रलेयन्कार नमः
१२-ॐ चंद्रमोली नमः
१३-ॐ डमरूधारी नमः
१४-ॐ चंद्रधारी नमः
१५-ॐ मलिकार्जुन नमः
१६-ॐ भीमेश्वर नमः
१७-ॐ विषधारी नमः
१८-ॐ बम भोले नमः
१९-ॐ ओंकार स्वामी नमः
२०-ॐ ओंकारेश्वर नमः
२१-ॐ शंकर त्रिशूलधारी नमः
२२-ॐ विश्वनाथ नमः
२३-ॐ अनादिदेव नमः
२४-ॐ उमापति नमः
२५-ॐ गोरापति नमः
२६-ॐ गणपिता नमः
२७-ॐ भोले बाबा नमः
२८-ॐ शिवजी नमः
२९-ॐ शम्भु नमः
३०-ॐ नीलकंठ नमः
३१-ॐ महाकालेश्वर नमः
३२-ॐ त्रिपुरारी नमः
३३-ॐ त्रिलोकनाथ नमः
३४-ॐ त्रिनेत्रधारी नमः
३५-ॐ बर्फानी बाबा नमः
३६-ॐ जगतपिता नमः
३७-ॐ मृत्युन्जन नमः
३८-ॐ नागधारी नमः
३९- ॐ रामेश्वर नमः
४०-ॐ लंकेश्वर नमः
४१-ॐ अमरनाथ नमः
४२-ॐ केदारनाथ नमः
४३-ॐ मंगलेश्वर नमः
४४-ॐ अर्धनारीश्वर नमः
४५-ॐ नागार्जुन नमः
४६-ॐ जटाधारी नमः
४७-ॐ नीलेश्वर नमः
४८-ॐ गलसर्पमाला नमः
४९- ॐ दीनानाथ नमः
५०-ॐ सोमनाथ नमः
५१-ॐ जोगी नमः
५२-ॐ भंडारी बाबा नमः
५३-ॐ बमलेहरी नमः
५४-ॐ गोरीशंकर नमः
५५-ॐ शिवाकांत नमः
५६-ॐ महेश्वराए नमः
५७-ॐ महेश नमः
५८-ॐ ओलोकानाथ नमः
५४-ॐ आदिनाथ नमः
६०-ॐ देवदेवेश्वर नमः
६१-ॐ प्राणनाथ नमः
६२-ॐ शिवम् नमः
६३-ॐ महादानी नमः
६४-ॐ शिवदानी नमः
६५-ॐ संकटहारी नमः
६६-ॐ महेश्वर नमः
६७-ॐ रुंडमालाधारी नमः
६८-ॐ जगपालनकर्ता नमः
६९-ॐ पशुपति नमः
७०-ॐ संगमेश्वर नमः
७१-ॐ दक्षेश्वर नमः
७२-ॐ घ्रेनश्वर नमः
७३-ॐ मणिमहेश नमः
७४-ॐ अनादी नमः
७५-ॐ अमर नमः
७६-ॐ आशुतोष महाराज नमः
७७-ॐ विलवकेश्वर नमः
७८-ॐ अचलेश्वर नमः
७९-ॐ अभयंकर नमः
८०-ॐ पातालेश्वर नमः
८१-ॐ धूधेश्वर नमः
८२-ॐ सर्पधारी नमः
८३-ॐ त्रिलोकिनरेश नमः
८४-ॐ हठ योगी नमः
८५-ॐ विश्लेश्वर नमः
८६- ॐ नागाधिराज नमः
८७- ॐ सर्वेश्वर नमः
८८-ॐ उमाकांत नमः
८९-ॐ बाबा चंद्रेश्वर नमः
९०-ॐ त्रिकालदर्शी नमः
९१-ॐ त्रिलोकी स्वामी नमः
९२-ॐ महादेव नमः
९३-ॐ गढ़शंकर नमः
९४-ॐ मुक्तेश्वर नमः
९५-ॐ नटेषर नमः
९६-ॐ गिरजापति नमः
९७- ॐ भद्रेश्वर नमः
९८-ॐ त्रिपुनाशक नमः
९९-ॐ निर्जेश्वर नमः
१०० -ॐ किरातेश्वर नमः
१०१-ॐ जागेश्वर नमः
१०२-ॐ अबधूतपति नमः
१०३ -ॐ भीलपति नमः
१०४-ॐ जितनाथ नमः
१०५-ॐ वृषेश्वर नमः
१०६-ॐ भूतेश्वर नमः
१०७-ॐ बैजूनाथ नमः
१०८-ॐ नागेश्वर नमः