Thursday, 2 March 2017

भराडीच्या जञेचे सत्य.......





भराडी देवी ही भरडावर सापडली म्हणून तीचे भराडी नामकरण करण्यात आले.आज जे भव्य दिव्य तीचे मंदीर बांधण्यात आले आहे तीथे भराडीच्या पाशाणाची स्थापना करण्यात आली आहे.जञेच्यावेळी त्याच पाशाणाला चांदीचा मुखवटा व हाथ लावून साडीचोळी नेसवून सजविली जाते.
      मागेच सांगीतले की आंगण्याच्या वशीकाचे तेरावे करून जञेची सुरूवात करता.जञा ही दीड दिवसांची असते.त्याच प्रमाण सांगायचे झाले तर आदल्या दिवशी मंदीरात शिजवलेल्या भातातील मुठभर भात हे मानकरी असलेले सर्व आंगणे मिळून वेशीवर उडवला जातो. मग वेश  (गावची सिमा ) भावीकांनसाठी उघडी केली जाते.मग जञेची सुरूवात होते.
   हि देवी सत्वाची असून माहीर वाशिणीनां ही पावते असे म्हणण्यात येते.अजून पण देवीला जो प्रसाद बनविण्यात येतो तो प्रसाद आंगण्याच्या सुणांन कडून न बनविता त्यांच्या मुलीन कडून बनविण्यात येतो.प्रसाद बनविताना एक नियम कटाक्षाणे पाळला जातो. तो म्हणजे मुखातून एकही शब्द् बाहेर पडता कामा नये.प्रसाद बनवून आल्यावर तो एका परातीत केळीच्या पानावर मांडतात.त्यात भोपळ्याची भाजी व वडे असतात.समस्त आंगणेवसाला फक्त त्याच दिवशी भोपळ्याची भाजी खायाची परवानगी असते.नैवेद्याचे ताट बनवून झाले की ते एका हिरव्या साडीत गुडांळून गाठोड्या सारखे बांधले जाते.मग त्या गाठोड्याची विधीवत पुजा होते.पुजा झाल्यावर आंगण्याच्या मुली ते गाठोडे डोक्यावर घेऊन मंदिराच्या दिशेने रवाना होतात.
त्यांना वाट दाखविण्यासाठी समस्त आंगणेवस हे पेटती जंजी किव्हां माशाल  घेऊन त्यांच्या बरोबर चालत असतात.मंदिरात पोहोचल्यावर ते गाठोडे उघडून
 गा-हाणे  केले जाते.देवीला नैवेद्या दाखवीला जातो. मग त्यातून नैवेद्य काढून उरलेला आंगण्यांच्या घरी पाठवीला जातो.मग ते ताठ घेऊन मुली माघारी फिरतात.त्या प्रसादा साठी भाविकांची एकच झूंबड उडते.कारण त्या प्रसादाला आई भराडीचा स्पर्श झाला आहे अशी धारणा असते.
  त्या मुली त्या गर्दीतून वाट काढत आपआपल्या घरी पोहोचतात.त्यांच्या मागे जितके पाहुणे येतात त्यांना आंगणे जेवायला वाढतात. हा रितीवाज आहे.पण कोणत्याही भावीकाला त्यातील वडा प्रसाद म्हणून घरी घेऊन जावयास देत नाही.त्यांच्या मते देवी ही तांदळाच्या वड्याने आली.जर कोणी भाविक वडा घेऊन जाईल तर देवी पण त्याच्या सोबत गावा बाहेर जाईल असे त्यांचे मत आहे.
    काही जाणकारांच्या मते ही देवी सत्वाची धनी आहे पण दान धर्माची नाही.तीची कोणतीही वस्तू भाविकांना प्रसाद म्हणून देण्यात येत नाही. दिला घडविलेले दागिने हे भक्तांनी दान केलेल्या सोन्या चांदिनेच घडविले जातात. तिला आलेल्या सर्व साड्या ह्या एकञीत करून होमात पेटविल्या जातात. मग ती कितीही महागातली का असेना पण भक्तांना देण्यात येत नाही.         याचे परिमाण म्हणजे एकदा आंगणेवाडीत नाटक होते त्यात स्ञी पाञाची भुमिका साकारणा-या कलाकाराची बँग हरवली. नाटकात काम करण्यासाठी तीच्याकडे साडी नव्हती. त्या साठी तीने देवीची साडी देण्यात यावी अशी मंदिर प्रशाषनाकडे विनंती केली.तेव्हां नाटक झाल्यावर ती साडी पुन्हां मंदिरात जमा करावी या अटीवर तीला साडी देण्यात आली. नाटक संपल्यावर तीने ती अट पुर्ण ही केली. पण त्या साडीचा एक धागा चुकून तीच्या पदराला चिटकला.मंडळी माघारी जावयास निघाली. पण त्यांना गावाबाहेर पडताच येईना.हैरान होऊन त्यांनी त्या गावातच ती राञ  मुक्कम करण्याचे ठरविले.व तेथेच झोपी गेले.तेव्हां ती साडी परीधान केलेल्या स्ञी ला त्या देवीने स्वप्नात येऊन दृष्टांत दिला. की माझ्या साडीचा एक धागा तूझ्या पदराला चीटकला आहे तो मंदीरात जाऊन ठेव.मगच तूम्हांला वेश ओलांडता येईल.
   सकाळी जाग आल्यावर तीने हा प्रकार आपल्या सहका-यानां सांगीतला.शोधा शोध केली असता देवीची वाणी खरी ठरली. धागा तीच्या पदराला चीकटलेला आढळला.ते तसेच मंदिरात गेले व घडलेल्या प्रकाराची माफी मागीतली.तेव्हां कुठे त्यांना बाहेर पडता आले.
    अशी ही भराडी  देवी सत्वाला जागली पण दान धर्माला नाही.तीची एकही वस्तू ती आजही गावाबाहेर जाऊ देत नाही.आजही जञेत कोणी जर कोणाचे पाकीट चोरले तर तो चोर त्या गावातच फीरत रहातो.त्याला मार्ग सापडत नाही जो पर्यत तो ते पाकीट मंदीरात जमा करीत नाही.

 $$ आई भरडी मातेचा उंद उंद $$
                                                                 
!!ॐ चैतंन्य देव परशुराम नम: !!